श्री संत दामाजी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १४ एप्रिल, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी.


मंगळवेढा:-

श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले व  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार व पर्यवेक्षक प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पवार म्हणाले की,महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अत्यंत मोलाचे असे आहे या महामानवांनी सर्वसामान्यांना,शोषितांना,पीडितांना, स्त्रियांना त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून सन्मानाची वागणूक दिली.


महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आजच्या परिस्थितीमध्येही अजूनही शेतकऱ्यांची अवस्था फार हलाखीची आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही,बी- बियाणे व खतांच्या किमती वाढलेल्या आहेत,महागाई वाढलेली आहे.


त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हातात आसूड घेण्याची वेळ आलेली आहे फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला,विधवा पुनर्विवाहस मान्यता दिली शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले विविध ग्रंथ लिहून व छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून लोकांचे प्रबोधन केले.


माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेच्या उतरंडीला छेद देऊन वंचित व शोषित समाजाला आधार दिला शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हा संदेश दिला आजच्या परिस्थितीत युवकाच्या हाताला काम नाही बेरोजगारी वाढलेली आहे,महागाई वाढलेली आहे,अशा काळात सर्वांनी एकत्र येऊन,संघटित होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे अशावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समोर ठेवून लोकशाही मार्गाने आपण पुढे जाऊया असे सांगून शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.औदुंबर जाधव,प्रा.विनायक कलुबर्मे,प्रा.डॉ.नवनाथ जगताप,प्राध्यापिका खांडेकर मॅडम यांनीही मनोगते व्यक्त केली.


कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.राजकुमार पवार यांनी केले तर,प्रा.डॉ.दत्तात्रय गायकवाड यांनी आभार मानले.


test banner