Pravasi Bharatiya Divas 2024 : का साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस? महात्मा गांधींशी आहे कनेक्शन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

Pravasi Bharatiya Divas 2024 : का साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस? महात्मा गांधींशी आहे कनेक्शन.
दरवर्षी 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीयांनी केलेल्या योगदानाची नोंद घेण्यासाठी साजरा केला जातो. 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे, 1915 या दिवशी मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते.  भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे त्यांनी नेतृत्व केले होते आणि भारतीयांना इंग्रजांच्या जाचातून सुटका मिळवून दिली होती. 2003 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त परिषदा आयोजित केल्या जातात. या परिषदेमार्फत परदेशी भारतीय समुदायाला त्यांच्या मातृभूमीतील भूमीतील लोकांशी कनेक्ट करून देते. या दरम्यान भारताच्या विकासात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या  भूमिकेचे कौतुक करण्यासाठी त्या व्यक्तींना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ देखील प्रदान करतो.

प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची सुरवात भारत सरकारने एल. एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समिती शिफारशींनुसार हा निर्णय घेतला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 8 जानेवारी 2002 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात समितीचा अहवाल नुसार 9 जानेवारी 2002 हा दिवस "प्रवासी भारतीय दिवस" ​​(PBD) म्हणून घोषित केला. 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतल्याच्या निमित्ताने हा दिवस निवडला गेला.


♦️या दिवसांचे महत्व काय आहे?

खरंतर 9 जानेवारीला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, म्हणूनच 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. गांधी भारतात परत येणे आपल्या देशासाठी एक महत्वाची घटना ठरली. त्यानंतरच गांधीनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लढा दिला. म्हणूनच भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी 9 जानेवारीला साजरा केला जातो.

हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून परदेशात राहाणाऱ्या भारतीयांच्या मनात भारताबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त होण्यासोबतच त्यांचा देशवासीयांशी सकारात्मक संवाद व्हावा. त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा. हा दिवस साजरा करण्याचा आणखी एक उद्देश असाही असावा की, देशातील तरुण पिढीला परदेशात काम करत असलेल्या भारतीयांशी सुसंवाद होत राहील त्यांचे योगदान तरुणांपर्यंत पोहचेल. प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना दिवंगत लक्ष्मीमल सिंघवी यांनी मांडली होती.

♦️प्रवासी भारतीय सन्मान (Pravasi Bharatiya Samman)

जे लोक भारताबाहेर स्थायिक झाले आणि जगातील इतर देशांमध्ये स्थायिक झाले त्यांना प्रवासी भारतीय असे म्हणतात. अशा नागरीकांना 'प्रवासी भारतीय सन्मान' हा भारत सरकारडून दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार प्रवासी भारतीयांना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखणीय योगदानाबद्दल दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी 9 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.

हे नागरीक परदेशात राहूनही परदेशातील भारतीयांनी आपला सांस्कृतिक आणि भाषिक वारसा जपल्यामुळे भारताची त्या-त्या देशात स्वतःची ओळख टिकून राहते. अमेरिका, चीन, रशिया, जपान असे काही देश आहेत, जिथे भारतासह जगभरातून मोठ्या संख्येने स्थलांतरित होतात.

♦️देशाच्या प्रगतीत मोठे योगदान

रोजगाराच्या शोधात भारतातील अनेक लोक मोठ्या संख्येने परदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. तेथे ते चांगल्या पदांवर काम करत आहेत आणि आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. देशाच्या प्रगतीत परदेशात राहत असलेल्या भारतीयांचा मोठा वाटा मानला जातो. भारतीय प्रवासी नागरीक परदेशात राहून त्यांच्या क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करतात आणि परकीय चलन भारतात पाठवण्यात जगभरात आघाडीवर आहेत.

♦️प्रवासी भारतीय दिवसाचा उद्देश

अनिवासी भारतीयांना त्यांच्या देशाविषयीचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी तसेच देशवासियांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
स्थलांतरितांच्या कामगिरीबद्दल भारतीयांना माहिती देणे आणि त्यांच्याकडून देशातील नागरिकांना कोणत्या अपेक्षा आहे त्याची जाणीव त्यांना करून देणे.
जगभरातील 110 देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे.
इतर देशांची भारताची असलेली भारताच्या सौहार्दपूर्ण संबंधांमागे स्थलांतरितांची कोणती भूमिका आहे याबाबदल माहिती देणे.
देशातील तरुणांना स्थलांतरितांशी जोडणे.
भारतीय कामगारांना परदेशात कराव्या लागणाऱ्या अडचणींवर चर्चा करणे.

▪️भारताप्रती अनिवासी भारतीय आणि देशवासीय यांच्या विचार, भावना आणि सकारात्मक संवाद व्हावा यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

▪️जगातील सर्व देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे.

▪️तरुण पिढीला स्थलांतरित झालेल्या नागरिकांशी जोडणे.

▪️परदेशात राहणाऱ्या भारतीय कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे.

▪️अनिवासी भारतीय लोकांना त्यांच्या देशाकडे आकर्षित करणे, त्यांचे संबंध टिकवूण ठेवणे.

▪️गुंतवणुकीच्या संधी वाढवणे.

♦️प्रवासी भारतीय दिवस 2024 साठी थीम

एखादे संमेलन किंवा परिषदेचे आयोजन केले जाते तेव्हा, त्या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी एक विषय ठरवला जातो. त्या विषयाशी अनुसरून मुद्दे, चर्चासत्रे तसेच त्याच्याशी संबंधित अडचणींवर चर्चा केली जाते. प्रवासी भारतीय दिवस  २००३ पासून साजरा केला जातो आणि या निमित्ताने प्रवासी भारतीय परिषदेचे आयोजन केले जाते. वर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या प्रवासी भारतीय संमेलनासाठी 'आत्मनिर्भर भारतासाठी योगदान' ही थीम ठेवण्यात आली आहे.

- अजय आदाटे (मंगळवेढा)


test banner