मंगळवेढा:-
काँग्रेस कमिटी कडून सलगर खुर्द येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी ते सर्वांना संबोधित करताना असे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश त्यांची 134 वी जयंती समता दीन म्हणून साजरी करत आहोत.
आपण सर्वजण डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे जीवन साजरे करतो,जे खरे द्रष्टे आणि सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आहेत ज्यांची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहेत.
ऍड.रविकिरण कोळेकर यांनी हार घालून आपले मनोगत व्यक्त केले,सौ.संध्या विलास काटकर (उपसरपंच, ग्रामपंचायत सलगर खुर्द), रमेश ओलेकर (ग्रामपंचायत सदस्य), अशोक गडगे, सखाराम भुसनर, संभाजी भुसनर, तानाजी ओलेकर, भागवत सोनवले,सचिन सवईसर्जे, तानाजी पाटील, काशीनाथ गुरव, संतोष पाटील, युवराज माने यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, सूत्रसंचालन संजय ओलेकर यांनी केले तर सौरभ आदाटे यांनी सर्वांचे आभार मानले.