"आम्ही सर्व प्रथम भारतीय आहोत" ~बाबासाहेब डॉ.बी.आर.आंबेडकर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १४ एप्रिल, २०२४

"आम्ही सर्व प्रथम भारतीय आहोत" ~बाबासाहेब डॉ.बी.आर.आंबेडकर.


माझे वडील तुम्हाला तुम्हाला #बाबा म्हणतात.

माझे आजोबा पण तुम्हाला #बाबाच म्हणायचे.

मी पण तुम्हाला #बाबाच म्हणतो,

माझा मुलगा पण तुम्हाला #बाबाच म्हणतो.

एवढेच काय माझा नातू सुद्धा तुम्हाला #बाबाच म्हणेल...


मला नाही वाटत अस जगावेगळं नातं कुण्या ईतर व्यक्तिच असेल.

असा जगावेगळं नात असणार्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन...💐💐💐



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ  राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी पाणी, वीज आणि शेतीचा सूक्ष्म विचार  केला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती.तितकेच शेतीबद्दलही भान होते.शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते.देशात शेती,शेतकरी आणि शेतीशी संबंधित समूहाचा विचार छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, शाहूमहाराज आणि डॉ.आंबेडकर यांनीच केला. 


अवघे २७ वर्ष वयात डॉ.आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’हा शोधनिबंध लिहिला. शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आíथक स्तर उंचावणे शक्य नाही हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आíथक विकास झाला पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला तरच शेतीशी निगडित सर्व घटकाला या आíथक सक्षमतेचा फायदा होईल.


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी चळवळी उभ्या करून या देशातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांना संपवायचे होते.यासाठी त्यांनी २५ हजार शेतकऱ्यांचा देशातील पहिला मोर्चा काढला. एवढेच नाहीतर त्यांच्या नेतृत्वात ७ वर्षे दीर्घकाळ शेतकऱ्यांचा संप झाला. 


"जाती विसरून सर्व जण एकत्र आल्यास देश तुमच्या हातात येईल",असे ते सांगत. खोती पद्धतीच्या विरोधात त्यांनी लढा दिला.देशाचे पहिले पाटबंधारेमंत्री झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच देशाचे पहिले ऊर्जामंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन करीत वीज आणि पाण्याचे नियोजन केले. 


उद्योगांना वीज देताना कृषी उद्योगांना प्राधान्य दिले. डॉ.बाबासाहेबमुळे देशातील स्त्रियांना मताचा व समतेचा अधिकार मिळाला.कामगारांना न्याय मिळवून देऊन त्यांना सशक्त बनवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व देशाचे नेते होते. त्यांच्या विचारानुसार अनुकरण करणे महत्त्वाचे आहे.


-अजय आदाटे

संचालक, ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड पुणे.


test banner