पंढरपूर ( प्रतिनिधी) शहरात गोरगरिबांना त्रासदायक असलेल्या गुंडागर्दीला चाप लावण्यासाठी मी सतत पुढाकार घेतला. विधानसभेतही आवाज उठविला. मात्र, विरोधकांनी आजवर आपसात भांडणे लावून काट्याने काटा काढण्याचे काम केले. गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षणे टाकून स्वत:ची संपत्ती वाढविणाऱ्यांना या निवडणुकीत पुन्हा एकदा सुजाण मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असा ठाम विश्वास आ. भारत भालके यांनी व्यक्त केला..
राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतील मित्रपक्षांचे उमेदवार असलेले आ. भारत भालके यांच्या प्रचारार्थ शहरातील महावीरनगर, कालिकादेवी चौक या ठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. यामध्ये ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधीर धोत्रे, महादेव धोत्रे, लखन चौगुले, राहुल साबळे, किरण घाडगे, संजय बंदपट्टे, मनसेचे शशिकांत पाटील, दीपक येळे, संजय भिंगे, दत्ता भोसले, अशोक बंदपट्टे, महेश धोत्रे, धनंजय पवार, नितीन धोत्रे, अजय बंदपट्टे, पांडुरंग बंदपट्टे, अमोल बंदपट्टे, अण्णा बंदपट्टे, सोमनाथ देवकर, देविदास शेळके, अनिल पवार, पिंटू माळी, रोहिदास बंदपट्टे, विठ्ठल पवार, श्रीधर पवार, अक्षय मुंढेकर, अक्षय माने, आनंद कांबळे, सुरज गायकवाड, प्रविण माने, विशाल धोत्रे, आदित्य माने, आदित्य क्षीरसागर, नितीन माने, सुरेश बंदपट्टे, नवनाथ देवकर, समीर शेख, दादा तरटे, कुंदन सातपुते, हणमंत देवकते, निलेश धोत्रे, किरण माने, गणेश भोसले, अर्जुन माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. .
पुढे बोलताना आ. भालके म्हणाले, गेल्या १० वर्षात तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेली विकास कामे मांडून मते मागतोय. मात्र, विरोधक विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करीत आहेत. गोरगरीब, सर्वसामान्य घटकांसाठी त्यांनी काय केले? लोकांमध्ये ते किती मिसळून काम करतात? हे सर्वांना चांगले माहिती आहे. पैशाच्या मागे न लागता केवळ माणसं कमविली. गोरगरिबांची लूट थांबवून दडपशाहीला आळा घालण्याचा प्रयत्न मी नेहमी केला. त्यामुळेच लोकांच्या अंत:करणातच मी आहे. विरोधकांनी कितीही कुटनितीचा अवलंब करू द्या, असे आ. भालके म्हणाले. याप्रसंगी समाधान फाटे, सागर यादव, संदीप मांडवे, सुमित शिंदे, अॅड.राजेश भादुले आदींनी मनागेत व्यक्त केले..