दिवाळी तोंडावर येवूनही साखर कारखानदार बिलासाठी चिडूचिप! युटोपियन शुगरने ५५ रुपये बिल देवून शेतकऱ्याची केली दिवाळी गोड! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

दिवाळी तोंडावर येवूनही साखर कारखानदार बिलासाठी चिडूचिप! युटोपियन शुगरने ५५ रुपये बिल देवून शेतकऱ्याची केली दिवाळी गोड!


मंगळवेढा(प्रतिनिधी )मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांनी दिवाळी दोन आठवडयाच्या तोंडावर आली असतानाही  अदयापही ऊस बिलाची घोषणा  केली नाही. परिणामी दुष्काळ व तोंडावर आलेली दिवाळी यामुळे शेतकरी वर्ग ऊस बिलाकडे नजरा लावून बसला असून कारखान्यांनी फुल ना फुलाची पाकळी दिवाळीसाठी दयावी अशी मागणी होत आहे.
मंगळवेढा तालुक्यात श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा ,भैरवनाथ शुगर फॅक्टरी लवंगी, फॅबटेक साखर कारखाना नंदूर ,युटोपियन शुगर,कचरेवाडी असे चार साखर कारखाने आहेत. सध्या विधासभेसाठी निवडणूकीची धामधूम सुरु असल्याने  शेतकरी वर्गाकडे लक्ष दयायला कारखानदारांना वेळ नसल्याच्या भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. दि.२७ पासून दिपावलीस प्रारंभ होत आहे. युटोपियन शुगर फॅक्टरी वळगता अदयाप कुठल्याही साखर कारखान्याने दिवाळीसाठी शेतकर्‍यांना ऊस बिलाची घोषणा केलेली नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे.यंदा हस्त नक्षत्रात पडलेला दमदार पाऊस यामुळे शेतकरी वर्ग ऊस लागवडी,अंतर्गत मशागती,पेरणी आदी कामे करण्यात तो मग्न आहे. मात्र यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा नसल्यामुळे तो दिवाळीसाठी मिळणार्‍या ऊसबिलाकडे डोळे लावून बसला आहे. मंगळवेढयातील साखर कारखान्याबरोबर जिल्हयातील अन्य कारखान्यांनीही अदयाप बिलाची घोषणा केलेली नाही. प्रत्येक साखर कारखानदार अगोदर कोण घोषणा करतेाय? याची प्रतिक्षा करीत आहेत.परिणामी दिवाळीचे  बिल मिळण्यासाठी शेतकर्‍यांना विलंब होत असल्याचा  बोलबाला सुरु आहे.मागील  महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी ऊ स बिले मिळावीत या मागणीसाठी तहसिल कार्यालयापुढे आंदोलन केले. यावेळी प्रत्येक साखर कारखानदारांनी लेखी स्वरूपात तहसिलदार यांचे समक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला  बिले देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यावर आंदोलन तूर्त स्थगित केले होते. अदयापही याची कार्यवाही न झाल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्क करीत आहे.
-----------
test banner