राज्यातील धनगर समाजाला हक्काचे आरक्षण भाजप सरकारच देणार-गोपीचंद पडळकर निवडणूक पुरताच आ.भारत भालकेंना धनगर समाज आठवतो! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

राज्यातील धनगर समाजाला हक्काचे आरक्षण भाजप सरकारच देणार-गोपीचंद पडळकर निवडणूक पुरताच आ.भारत भालकेंना धनगर समाज आठवतो!



मंगळवेढा(प्रतिनिधी) आ.भारत भालके यांनी गेल्या निवडणुकीत येथील धनगर समाजाला फसवून त्यांची मते मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची दिशाभूल केली असून राज्यातील धनगर समाजाला हक्काचे आरक्षण भाजप सरकारच देणार असल्याचे प्रतिपादन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.        ते महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ नंदेश्वर येथील जाहीर सभेत बोलत होते.
व्यासपीठावर आ.सुजितसिह ठाकूर,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,माजी सभापती अँड.नंदकुमार पवार,सूर्यकांत ठेंगील,रयतक्रांतीचे दीपक भोसले,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण,साईनाथ अभंगराव,शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम कुदले,रासपाचे बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे,दिनकर मोरे, सरपंच रामेश्वर मासाळ,बाबासाहेब बेलदार,जयंत साळे,कांतीलाल ताटे,नितीन पाटील,शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर,भीमराव मोरे आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की,आ.भारत भालके यांचा दोन महिन्यांपूर्वी फोन आला होता काँग्रेस मध्ये राहून आत्ता काही उपयोग नाही,मतदारसंघातील कोणतेच काम होत नाही म्हणून सांगत होते. पण ते आत्ता काय करतात.भ्रष्टाचारी पक्षात गेले.
सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेसच ते विजय झाले आहेत.आमदार भारत भालके यांनी माझ्या विरोधात एक पत्रक काढले मी माझ्या समाजासाठी काय करतो हे सर्वांना माहिती आहे.त्यांनी आपल्या समाजासाठी राजीनामा देण्याचे केवळ नाटक केले.विरोधक विनाकारण स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी वाईट प्रचार करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांचे नेते अक्षरणासाठी वेळ देत नव्हते.धनगर समाजाची केवळ त्यांनी दिशाभूल केली असल्याचा घणाघात त्यांनी केला.
याच सरकारने सोलापूर विद्यापीठासाठी अहिल्याबाई होळकर नाव दिले.कमळ घराघरात पोचवून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना भाजप सरकार पाणी देणार.रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे,शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळाला.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणून शेतकऱ्यांचे जीवन सफळ केले.
अजित पवारांना जेल मध्ये जायची वेळ आली आहे.अण ते प्रचार करत फिरत आहेत.भालके यांनी गेल्या १० वर्षात एकही विकासात्मक काम केलेले नाही. महराष्ट्रात २२५ आमदार महायुतीचे येणार असून मंगळवेढा-पंढरपूरचा आमदार सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करा.ज्या पक्षाला आपल्या स्वतःच्या मतदारसंघात पाणी देता आले नाही ते मंगळवेढा साठी काय पाणी देणार.महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास घात राष्ट्रवादी काँग्रेस ने केला आहे.सर्वसामान्य लोकांना हक्काचे अधिकार भाजपच देऊ शकते.
शरद पवार हे आपल्या घरातील नातवंड व मुलीला उभे करण्यासाठी फिरत आहे त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही.राष्ट्रवादी पक्ष म्हणजे अलिबाबा चाळीस चोर पार्टी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार शशिकांत चव्हाण यांनी मानले.

test banner