वारी परिवार सायकल क्लबची मंगळवेढा - सिद्धनकेरी सायकल राईड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २१ जुलै, २०२५

वारी परिवार सायकल क्लबची मंगळवेढा - सिद्धनकेरी सायकल राईड.


मंगळवेढा:- 

मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा-खोमनाळ-भाळवणी-जालिहाळ-सिद्धनकेरी-मंगळवेढा 40 किलोमीटरची सायकल राईड काढून भारत सरकारच्या सुरु असलेल्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल चळवळीस चालना दिली आहे.


सदर उपक्रमातून सायकल चालवण्याला शाश्वत,सर्वसमावेशक आणि अनेक आरोग्य लाभांसह पर्यावरणपूरक व्यायाम म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी वारी परिवार सायकल क्लब सतत प्रयत्नशील आहे.


आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करीत आहे त्यासाठी फिटनेसबद्दल लोकांच्या मध्ये जागरूकता वाढवून पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून जास्तीत जास्त लोकांनी सायकलीचा वापर करावा तसेच फिटनेस का डोस आधा घंटा रोज म्हणजेच दररोज किमान तीस मिनिटे सायकलिंग करावी आणि समग्र आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी सदर राईडचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी सर्व सायकलस्वारांनी सिद्धनकेरी येथील निसर्गरम्य असणाऱ्या मंदिरातील सिद्धेश्वराचे दर्शन घेतले याप्रसंगी सिद्धनकेरी मठाच्या वतीने मठाधिपती यांनी स्वागत केले.


फिटनेसबद्दलची जागरुकता निर्माण होण्यासाठी आयोजित केलेल्या राईड मध्ये क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे,शिवन्या कलुबर्मे,विजय क्षीरसागर,नंदकुमार नागणे,प्रफुल्ल सोमदळे,सिद्धेश्वर डोंगरे,प्रा महेश अलिगावे,अविराज जाधव,विष्णू भोसले,पांडुरंग कोंडूभैरी,प्रा.विनायक कलुबर्मे आदीजण सहभागी होते.


यावेळी सिद्धनकेरीचे समाधान चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभले.


test banner