वारी परिवाराने केली मंगळवेढा-मरवडे सायकल रॅलीतून मतदार जनजागृती. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

वारी परिवाराने केली मंगळवेढा-मरवडे सायकल रॅलीतून मतदार जनजागृती.


मंगळवेढा:-

आगामी होणारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता तहसिलदार तथा निवडणूक सहाय्यक अधिकरी मदन जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी डॉ.चरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने रविवारी मंगळवेढा-मरवडे मार्गांवरती सायकल रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आली.


सकाळी ६.३० वाजता दामाजी पुतळ्यापासून सुरु झालेली सायकल रॅली मरवडे गावात पोहचल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.


यावेळी मरवडे गावातून फिरून घरोघरी मतदानाचा मूलभूत हक्क किती महत्वाचा आहे या आशयाची पत्रके वाटून तसेच मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो,आपले मत पवित्र मत,मतदान करूया लोकशाही बळकट करूया,अमिषाला बळी न पडता मतदान करा अशा घोषणा देऊन मतदार जनजागृतीचा जागर घालण्यात आला.


तर हरिप्रसाद देवकर यांनी सर्वांना मतदानाविषयी शपथ दिली तसेच दिनांक २० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून आपला मूलभूत हक्क बजावावा असे आवाहन वारी परिवार व तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले.


खरंतर वारी परिवार सायकल क्लबने सायकल रॅली काढून लोकशाहीच्या या उत्सवात सर्व नागरिकांचा सहभाग घेऊन मतदार जनजागृती केल्याबद्दल स्विप नोडल अधिकारी जगन्नाथ गारुळे यांनी सर्व सायकल स्वारांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानले.


यावेळी डॉ.राजाराम पवार,अंबादास पवार,सुरेश पवार,बबन माने,प्रा.सुधीर पवार,तेजस गणपाटील,आबा पाटील,सौरभ रोंगे,राजू येडसे,नामदेव अवघडे,महेंद्र शेंबडे यांचेसह मरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


सदर सायकल रॅलीत जयंत पवार,शरद हेंबाडे,प्रा.महेश अलिगावे,दत्तात्रय भोसले,महादेव धोत्रे,रतिलाल दत्तू,पांडूरंग नागणे,सिद्धेश्वर डोंगरे,चंद्रजीत शहा,रोहित वाघ,गणेश मोरे,समीर गुंगे समर्थ महामुनी,अरुण गुंगे,प्रा.विनायक कलुबर्मे,पार्थ भगरे,प्रफुल्ल सोमदळे,नाना भगरे,चंद्रकांत चेळेकर,स्वप्निल टेकाळे,सतिश दत्तू आदिनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.


test banner