प्रतिनिधी :
मंगळवेढ्यातील सुवर्ण महोत्सवी वाटचाल करणाऱ्या एस बी मोगले जवळेकर वस्त दालनातील “ आषाढ साडी महोत्सव ” ला तालुक्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद. सालाबादप्रमाणे या वर्षीही आषाढ साडी महोत्सव सुरु झाल्यापासून महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे
वस्त्र दालनाचे व्यवस्थापक प्रवीण मोगले यांनी सांगितले कि “ आषाढ महिन्यात सुरु होणाऱ्या या सेल ची महिला वर्गात कायम उत्सुकता असते. आवडणाऱ्या दर्जेदार साड्याची खरेदी अत्यंत कमी बजेट मध्ये होते. यंदाही खरेदीसाठी महिलांनी आमच्या वस्त्रादालनाला पसंती दिली आहे. ”
मंगळवेढ्यात भरपूर व्हरायटी आणि मोठी सवलत फक्त इथेच मिळत असल्यामुळे आम्ही साड्या खरेदीला इथेच पसंती दिली आहे. असे मत खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकांनी सांगितले.
शेवटचे फक्त काही दिवस राहिले असल्यामुळे आवडत्या साड्यांचा स्टॉक संपण्याच्या आधीच आपली खरेदी करा असे आवाहन व्यवस्थापकाकडून करण्यात आले आहे.