कुठून ही उमेदवारी घ्या यंदाच्या अतितटीच्या लढतीत आवताडे गटाची मदत संजीवनी ठरणार ! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

कुठून ही उमेदवारी घ्या यंदाच्या अतितटीच्या लढतीत आवताडे गटाची मदत संजीवनी ठरणार !

 


मंगळवेढा प्रतिनिधी :

विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे इच्छुकांची उमेदवारी अंतिम टप्प्यात आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात लढत अतिटतीची होणार हे नक्की.

मंगळवेढा तालुक्यात मा. बबनरावजी आवताडे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आपला गट चांगला बांधला आहे त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभेला खासदार प्राणिती शिंदेला मिळालेल्या लिड ने ठळक झाला आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीत असलेले सरपंच आणि सदस्य तसेच सोसायटीत एक हाती वर्चस्व या त्यांच्या जमेच्या बाजू आहेतच शिवाय मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी वर्गही चांगला संपर्कात आहे.  निवडणुकीत  ग्रामीण भागात याचा चांगला इफेक्ट जाणवणार आहे.  

सोबतच युवा नेते दामाजी साखर कारखान्याचे संचालक मा. सिद्धेश्वर आवताडे यांनी युवकांची चांगली टीम मंगळवेढा शहर आणि ग्रामीण ला बनवली आहे. कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे.नवीन मतदार युवा वर्ग असल्यामुळे त्याचा चांगला फायदा गटाला होईल.

 

मागील पाच वर्षात मतदार संघात खूप उलथापालथ झाली आहे त्यात आपला गट मजबूत पणे बांधून ठेवण्यात आवताडे गट यशस्वी झाला आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता “सध्या वेट अँड वॉच” असे म्हणाले. पण असे  म्हणत असले तरी वरच्या पातळीवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका यांची रणनीती ठरवायचे प्लॅनिंग सुरू असल्याच्या चर्चा समजतात.

लवकरच त्यांची भूमिका जाहीर करतील त्यामुळे नक्की कुणाला लाडू मिळणार आणि कुणाचे फटाके वाजणार हे लवकरच समजेल

test banner