ओंकार बागल यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईला घडविले विमानातून तिरुपती बालाजीचे दर्शन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

ओंकार बागल यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईला घडविले विमानातून तिरुपती बालाजीचे दर्शन.


मंगळवेढा:-

ओंकार बागल यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईला विमानातून घडविले तिरुपती बालाजीचे दर्शन त्यांनी विचार केला आईने जन्म दिला आपण आईसाठी काय केलं तिनं आपल्याला एवढे सुंदर जग दाखवलं तोच दिवस वाढदिवस म्हणून साजरी करतो आपण पार्टी देतो मित्रांना बाहेर वाढदिवसानिमित्त पण कधी आईला पार्टी दिली आहे का?आई आपल्याला म्हणते आनंदित रहा बाळा पण आईला कधी आपण आनंदीत बघितल आहे का आपला वाढदिवस कधी आईचा वाढदिवस म्हणून साजरा केला आहे का?आईला हवं ते मिळूदे देवाकडे कधी पार्थना केली आहे का?पण ती करते आपल्या मुलाला हवं ते मिळू दे आयुष्यात किती मोठे झालो पण आई म्हणत नाही मोठा झाला बाळा तोपर्यंत आपण कधी मोठ होत नाही भले पैशाने मोठा नाही झालो पण आईला विमानामध्ये बसवून मोठा झालो.

श्रद्धा आणि अध्यात्म कुठे असत ते माहित नाही पण प्रवास करताना आईच्या चेहऱ्यावरती आनंद बघून नक्की आईच्या आनंदातच आसत ते समजल प्रत्येक मुलान आपल्या आईसाठी काय तर कराव ही इच्छा त्यांनी या वेळेस बोलून दाखवली.


test banner