वारी परिवारास आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २० जुलै, २०२५

वारी परिवारास आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर.


मंगळवेढा:-

डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार वारी परिवार मंगळवेढा या सामाजिक संस्थेस जाहीर करण्यात आलेला आहे.


वारी परिवाराच्या वतीने अनेक लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.दारू नको दूध प्या,माणूसकीची भिंत,नेत्रदान महासंकल्प,नोकरी महोत्सव,विद्यार्थी दत्तक योजना,शैक्षणिक साहित्य वाटप,पर्यावरण रक्षण जनजागृती प्रबोधन सायकल रॅली,वृक्षलागवड व संवर्धन मोहिम,व्यसनमुक्ती अभियान,वीर जवान तुझे सलाम,सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा,ज्वारी मका परिषद,डांळीब उत्पादक शेतकरी कार्यशाळा,खूला गट खो खो स्पर्धा,एडस् जनजागृती सप्ताह,स्वच्छता मोहिमा,स्मशानभूमी गाय दान अशा सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कृषी,क्रिडा,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला.


सदर पुरस्काराचे वितरण दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे.


test banner