मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ संचलित संत दामाजी महाविद्यालयात चला पुस्तकाला रद्दी होण्यापासून वाचवूया या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समाजात जीवन जगत असताना प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दान करतो दानाचे विविध प्रकार आहेत आजघडीला सर्वत्र ‘गुप्त’ दान मोठ्या प्रमाणात केले जाते परंतु असे असताना इयत्ता 12 वी वाणिज्य शाखेत शिकणारे समर्थ घुले आणि निरंजन कोंडूभैरी यांनी आपल्याकडील 11 वीची पुस्तके रद्दीत न घालता किंवा अर्ध्या किंमतीला न विकता येणाऱ्या गरीब विदयार्थ्यांची वैचारिक भूक भागविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव व उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांचेकडे सुपूर्द करून महाविद्यालयास भेट दिली आहेत.
आपल्या घरातील पुस्तके जुनी होतात मग ती कुणी वाचत नाही,अशी पुस्तके रद्दीत देण्याऐवजी वाचनाची आवड असलेल्या गरजू विदयार्थ्यांना दिली तर खरोखरचं वाचन संस्कृती टिकेल आणि महाविद्यालयातील ग्रंथालयही समृद्ध होण्यास मदत होणार आहे सदर आगळ्या वेगळ्या उपक्रमातून विदयार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा संस्कार देखील जपला आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांप्रमाणेच विचार आणि भावना व्यक्त करणे ही मानवी प्रवृत्ती असून,वाचनामुळेच सदभावना वाढीस लागते यासाठी वाचनाची आवड असणे अंत्यत आवश्यक असून निश्चितच मुलांनी दान केलेली पुस्तके अनेक गरजू व गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जातील आज महाविद्यालयात अशा अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितिमुळे शाळा-कॉलेजची पुस्तके विकत घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी सर्वांनी पूढे येऊन पुस्तके दान करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा.धनाजी गवळी,सांस्कृतिक प्रमुख प्रा.गणेश भुसे,प्रा.दादासाहेब देवकर,प्रा.शैलेन्द्र मंगळवेढेकर प्रा. नवनाथ बुरुंगले,प्रसाद राजमाने यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते सदर उपक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.