शांतता रॅलीसाठी मंगळवेढ्यातील तरुणांची मंगळवेढा-सोलापूर सायकल राईड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

शांतता रॅलीसाठी मंगळवेढ्यातील तरुणांची मंगळवेढा-सोलापूर सायकल राईड.


मंगळवेढा:-

मराठा आरक्षण व सगेसोयरे अद्यादेश अंमलबजावणीसाठी मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र समाजासाठी लढत आहेत त्यासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीकरीता समाजासाठी आपलाही थोडा त्याग असावा याकरिता काही तरुणांची मंगळवेढा-सोलापूर मराठा आरक्षण सायकल राईड निघणार आहे.


बुधवारी पहाटे ५ वाजता शिवालयातील शिवमुर्तीचे दर्शन घेऊन सायकल राईडर सोलापूरकडे मार्गस्थ होणार आहेत.शांतता रॅलीसाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातुन बहुसंख्येने सकल मराठा समाजातील बांधव फोरव्हीलर तसेच टू व्हिलरने जाणार असले तरी काही तरुण मात्र सायकलवरती सोलापूरला जाणार आहेत हे विशेष आहे.


या आगोदरही या तरुणांनी जरांगे पाटील यांच्या हाकेला धावून मंगळवेढा-अंतरवाली-सराटी ३१० किमीचा प्रवास सायकल वरती पूर्ण करून समजाबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली होती.


test banner