संत चोखामेळा स्मारकासाठीचा निधी वर्ग करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

संत चोखामेळा स्मारकासाठीचा निधी वर्ग करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.


मंगळवेढा:-

देहू,आळंदी,भंडारा डोंगर,पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत मंजूर असलेल्या मंगळवेढा नगरीतील संत चोखामेळा स्मारकासाठीचा निधी लवकरच वर्ग करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


उपमुख्यमंत्री फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार समाधान आवताडे यांच्या मदतीने संत चोखामेळा मंदिर समिती व वारी परिवाराच्या शिष्टमंडळाने भेटून सदर स्मारकाचा निधी त्वरित वर्ग करून भूमिपूजनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भातील निवेदन दिले.


यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे,सचिव अविनाश शिंदे,पठाण शिवशरण,दत्तात्रय भोसले,सुदर्शन यादव,नागेश डोंगरे,कपिल हजारे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदीजण उपस्थित होते.


यावेळी आमदार आवताडे यांनीही सदर प्रस्तावाच्या निधीची मंजुरी घेऊन नियोजित स्मारकासाठी मुंबई येथे बैठक लावून काम सुरु करणार असल्याचे सांगुन मंगळवेढेकरांची स्वप्नपूर्ती पूर्ण करणार असल्याचे सांगितले.


मागील काही दिवसापूर्वीच मंगळवेढा नगरपरिषदेच्या सभागृहात स्मारकासंदर्भात झालेल्या बैठकीत स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी वारी परिवाराने पुढाकार घ्यावा असे ठरल्या नंतर शिष्टमंडळाने त्वरितच आमदार आवताडे यांच्याशी संपर्क साधून पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेण्यात आली होती.सदर स्मारक झाल्यास पर्यटन विकासास चालना मिळून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.


test banner