मंगळवेढा:-
आगामी विधानसभा काही दिवसांवर आलेली असतानाच राजकीय घडामोडीला वेग येताना दिसून येत आहे.
त्यामध्ये आज सोलापूर येथे राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली.
आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा राज ठाकरे यांनी दिला आहे.त्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. जवळपास 225 ते 250 जागा लढण्याची त्यांची तयारी दर्शवली आहे.
अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत एकनिष्ठ असणारे पंढरपूर मंगळवेढा येथील मनसे नेते व सहकार सेना प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
तसेच धोत्रे म्हणाले की पंढरपूर मंगळवेढ्याची जनता भर भक्कमपणे माझ्या पाठीमागे आहे. त्यानंतर मनसेचे मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे म्हणाले की पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकष्टा करणार आहे.
यावेळी ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.