मंगळवेढा नगरपरिषद व वारी परिवाराने सायकल रॅलीतून दिला हर घर तिरंगाचा नारा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

मंगळवेढा नगरपरिषद व वारी परिवाराने सायकल रॅलीतून दिला हर घर तिरंगाचा नारा.


मंगळवेढा:-

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवेढा नगरपरिषद व वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने सायकल रॅलीतून हर घर तिरंगाचा नारा देण्यात आला सदर रॅलीचे उदघाटन सर्व माजी सैनिक व मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवून करण्यात आले.


केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत शासकीय इमारत आस्थापना तसेच प्रत्येक गर्व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करून जनजागृती करण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषद व वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून आयोजित केलेल्या हर घर तिरंगा जनजागृती सायकल रॅलीतून घरोघरी तिरंगा,भारत माता की जय,वंदे मातरम,जय जवान जय किसान,अशा घोषणाचा जयघोष करून देशभक्तीचा जागर घालण्यात आला.


भारतीय स्वातंत्र्य दिनी मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरोघरी गौरवाने तिरंगा फडकाऊन नागरिकांनी स्वातंत्र्य दिन साजरा करावा यासाठी रॅलीतील प्रत्येक सायकलीला लावलेले तिरंगा ध्वज विशेष आकर्षण ठरले.


यावेळी सदर सायकल रॅलीमध्ये सर्व माजी सैनिक,मुख्याधिकारी चरण कोल्हे,कर निरीक्षक विनायक साळुंखे,कार्यालयीन अधीक्षक सचिन मिसाळ,लेखापाल सोमनाथ सरवदे,नोडल अधिकारी तेजस सूर्यवंशी यांचेसह वारी परिवार सायकल क्लब मधील सर्व सदस्य,जवाहरलाल प्रशालेतील विद्यार्थी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी होते.


test banner