मंगळवेढा:-
केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत शासकीय इमारत आस्थापना तसेच प्रत्येक गर्व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषद व वारी परिवार सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता हर घर तिरंगा जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी चरणकुमार कोल्हे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य दिनी मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरोघरी गौरवाने तिरंगा फडकाऊन नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा करावा यासाठी प्रत्येक सायकलीला तिरंगा ध्वज लावून शिवजयंती मार्गांवरून रॅली काढण्यात येणार असून सदर सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंगळवेढा नगरपरिषद व वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.