श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयात दिनांक १५ ऑगस्ट रोजी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा,सचिव किसन गवळी,ऍड रमेश जोशी,यादव आवळेकर,मुझ्झपर काझी,चंद्रशेखर कौडुभैरी,संतोष रंदवे,प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड,प्रा.विजय दत्तू यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभाचे प्रास्ताविक प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर प्रा गणेश जोरवर यांनी आभार मानले.