आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमी वरती पक्ष वाढीसाठी या गटाकडून गाव भेट दौरे व बैठका तर या गटाची वाढणार ताकद. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ३ जुलै, २०२४

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमी वरती पक्ष वाढीसाठी या गटाकडून गाव भेट दौरे व बैठका तर या गटाची वाढणार ताकद.
मंगळवेढा:-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पक्ष बांधणीसाठी,वाढीसाठी व शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोर्चे बांधणी साठी जिल्हा परिषद गटातून दौऱ्यांचे व गावोगावी विविध बैठकांचे आयोजन केले गेले आहे.


यामध्ये युवकांची मोठी ताकद दिसून येत आहे.शेतकऱ्यांमधून आशीर्वाद रुपी ऊर्जा मिळत आहे.तसेच पक्षाला आंधळगाव गटामधून देगाव,मल्लेवाडी,शरदनगर,मरापुर, गुंजेगाव,घरणिकी,महमदाबाद, शेलेवाडी,अकोला,लक्ष्मी दहिवडी,आंधळगाव गणेशवाडी,अकोला या गावातून पक्षाला प्रचंड मोठी ताकद मिळताना दिसत आहे. 


मंगळवेढा तालुक्यातून शरद पवार गटाला नवचैतन्य तयार करण्यासाठी गाव तिथे शाखा काढून राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करणे व पक्षाची ध्येय धोरणे गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दौऱ्याचे व विविध बैठकांचे आयोजन केले गेले आहे. 


या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,मुजफ्फर काझी,किसन गवळी, संतोष रंदवे,युवक शहराध्यक्ष जमीर इनामदार,सुभाष दादा ढेकळे,अजय ढेकळे,उपसरपंच अजित माळी, रायबान,शरद क्षीरसागर,उपसरपंच चांद भाई मुलानी,बळवंतराव पाटील,भुजंगराव आसबे,नागनाथ यादव,बंडोपंत पाटील,आकाश पाटील,बालाजी मेटकरी सुभाष सुडके,अण्णासो पाटील,तुकाराम चव्हाण नाना करपे,पांडुरंग कोष्टी,लखन पवार,रमेश गवळी,अनिल आदिलंगे,नवनाथ क्षीरसागर,काशिनाथ पाटील,सत्यवान लेंडवे,महादेव माळी,समाधान दत्तू,आबा लांडे,सैफअली शेख,आंधळगाव सरपंच लवाजी लेंडवे,सागर गुरव,सत्यवान लेंडवे,शब्बीर भाई नदाफ,काशिनाथ पाटील आदी.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


test banner