श्रीमती महानंदा गुंगे यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी ह.भ.प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ४ जुलै, २०२४

श्रीमती महानंदा गुंगे यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी ह.भ.प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन.


मंगळवेढा:-

28 जून रोजी शिवशाही बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणेवाडी आयोजित महानंदा गुंगे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ह.भ.प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून आईचे महत्व सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 


आई असताना कोणतीही चिंता नसते. आई शब्दाची उंची हिमालयापेक्षा ही उंच आहे.आईचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. आईला ओळखणारा परमात्माला ओळखू शकतो.आईला कधीही दुखवू नका तिचे आशीर्वाद नेहमी घ्या. तरच तुम्ही सुखी रहा असा संदेश देत कीर्तनाला सुरुवात करून कौटुंबिक सामाजिक प्रबोधन करून उपस्थित असणाऱ्या हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 


या कार्यक्रमासाठी जकराया शुगरचे एम.डी सचिन जाधव, मंगळवेढा अर्बनचे चेअरमन राहुल शहा,पक्षनेते अजित जगताप, दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, उपाध्यक्ष संतोष रणदिवे,सिद्धनाथ ज्वेलर्सचे मालक रावसाहेब चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती संभाजीराव गावकरे, मुख्याध्यापक सतीश कदम सर, माजी मुख्याध्यापक जयंत पवार, माझी उपसरपंच विष्णू मासाळ, तालुक्यातील, गावातील प्रतिष्ठित मंडळी, पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवशाही परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष माणिकराव गुंगे,संस्थेच्या सचिवा रेश्मा गुंगे,उपाध्यक्ष सुनील चव्हाण,सहसचिव शिवाजी गावकरे,खजिनदार विजय जाधव, सदस्य बालाजी गुंगे,समाधान गुंगे व स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी सर्व स्टाफने परिश्रम घेतले.


test banner