माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ३ जुलै, २०२४

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत

 



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थीनी कु. वृक्षांजली विशाल गेजगे हिने घवघवीत यश संपादन केले आणि ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. 

तिने या परीक्षेत यश संपादित करून , शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून विद्यालयाच्या यशामध्ये भर घातली आहे.यासाठी तिला प्राचार्य श्री.सुधीर पवार सर,सहशिक्षिका प्रतिभा यल्लटीकर-दीक्षित,योगेश्री काकडे,पल्लवी सातपुते,वैशाली जाधव,प्रभाताई राजगुरू यांचे मार्गदर्शन लाभले 

तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे विश्वस्त डॉ नंदकुमार शिंदे, डॉ पुष्पाजंली शिंदे, प्राचार्य सुधीर पवार सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
test banner