राष्ट्रवादी काँगेस पक्ष शरद पवार गट वाढीसाठी व बळकटासाठी पक्ष शाखा उद्घाटन समारंभाचे आयोजन केले गेले आहे.बुधवार दि.31 जुलै रोजी सकाळी 9.30 ते 2 या वेळेमध्ये विविध शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, प्रांतिक सदस्य राहुल शहा व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शाखा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
बुधवार दिनांक 31 जुलै रोजी देगाव,शरद नगर, मल्लेवाडी, मारापुर, गुंजेगाव, महमदाबाद, अकोला, घरनिंकी, गणेशवाडी, शेलेवाडी, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी इत्यादी गावांमध्ये शाखा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन समारंभ प्रसंगी सर्व शरदचंद्रजी पवार साहेब प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनी केले आहे.