मंगळवेढा:-
मराठा आरक्षण तसेच सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची ७ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर येथे शांतता रॅली होणार आहे.
त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक सदर बैठकीत गाडयांची व्यवस्था,झेंडे,डिजिटल बोर्ड,पाणी बॉटल,नाश्त्याची व्यवस्था,टोळ आदी गोष्टीवर चर्चा करून नियोजन करण्यात येणार आहे.
तसेच रॅलीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मंगळवेढ्यात येणार असून ढगे डिजिटलच्या वरील हॉलमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज्याच्या वतीने करण्यात आले.