कृष्ण तलाव येथे संतसृष्टीसाठी मनसेने घेतली आमदार समाधान आवताडे यांची भेट. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २७ जून, २०२४

कृष्ण तलाव येथे संतसृष्टीसाठी मनसेने घेतली आमदार समाधान आवताडे यांची भेट.मंगळवेढा:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांना म.न.से.कडून श्रीकृष्ण तलाव येथे भव्य दिव्य अशी संतसृष्टी उभा करणे याबाबत पत्र देण्यात आले. 


त्यांच्याशी चर्चा केली असता सकारात्मक उत्तर त्यांच्याकडून मिळाले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराच्या वतीने उष्णतालावर कृष्ण तलावात संत सृष्टी उभारणे बाबत माननीय आमदार समाधान दादा अवताडे यांच्याकडे मागणी पत्राद्वारे सादर केली कृष्ण तलाव ४६ एकरात पसरलेला आहे परंतु २५ ते ३० वर्षे झाले त्याचे कडे सर्व नागरिक,शासकीय कार्यालय,राजकीय पदाधिकारी,यांनी कधीही याचा विकास करणे बाबत वरीलपैकी कोणीच विचार व प्रयत्न केले नाहीत.


त्यावर एक चांगला उपयोग व विकास म्हणून श्रीकृष्ण तलावात संतसृष्टी उभारली तर मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडून पर्यटनाला वाव मिळेल शासनाच्या उत्पन्नात भर पडेल स्थानिकांना रोजगार मिळेल व इतर अनेक चांगल्या गोष्टी घडतील परंतु दुर्दैवाने याबाबत कोणीही विचार केला नाही असे मत मनसे शहराध्यक्ष राजवर हजारे यांनी व्यक्त केले. 


पंढरपूर येथील तुळशीबाग धरतीवर असेच एक ठिकाण झाडे ,तलाव, संतांच्या प्रतिमा, संतांच्या जीवनागाथा ,बोधकथा, दर्शक ठिकाण झाल्यास लहान मुले वयोवृत्त सर्व नागरिकांना  कृष्ण तलाव हे एक हक्काचे पर्यटन स्थळ होईल व मंगळवेढा मध्ये उद्योग व्यवसायास चालना मिळेल असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.


तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने विनंती केली की ४६ एकर मध्ये संत सृष्टी भव्य दिव्य प्रोजेक्ट तयार करून जास्तीत जास्त निधी व मान्यता मिळवून हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे ही विनंती करण्यात आली.


हे काम लवकरात लवकर आमदार समाधान अवताडे यांनी तडीस न्यावा एक अशी अपेक्षा व्यक्त केली. 


त्यावेळी उपस्थित मनसेचे वाहतूक सेना शहराध्यक्ष कृष्णा ओमाणे ,शहर उपाध्यक्ष श्रीकांत पवार ,बबलू हजारे, राजवीर हजारे मनसे शहराध्यक्ष आदी उपस्थित होते.


test banner