मंगळवेढा:-
शासकीय विभाग मंगळवेढा,शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा आणि पतंजली परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
सर्व प्रशासकीय अधिकारी संस्थेचे संचालक मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या हस्ते भारत मातेच्या आणि स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांचे प्रशालेतर्फे स्वागत करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी तहसीलदार प्रांत,सि.ओ.,गटविकास अधिकारी साळुंखे साहेब नगरपालिका सुभाष कदम प्रियदर्शनी कदम महाडिक तेजस्विनी कदम,पार्वती आवताडे,सुनंदा आवताडे, श्रीधर भोसले,यतीराज वाकळे,शशिकांत चव्हाण, सुदर्शन यादव,प्रा. रवींद्र काशीद,मुख्याध्यापक शंकर आवताडे,प्रफुल्लता स्वामी, शिवकुमार स्वामी,नितीन मोरे.
प्रसंगी प्रांत आणि तहसीलदार यांनी योग साधकांना,विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देत निरोगी राहणे हा आपला अधिकार आहे.यासाठी आपण दररोज योग प्राणायाम आयुर्वेदाचा वापर करावा असे सांगितले.
योग दिनानिमित्त जवाहरलाल प्रशाले मधील तनया मोरे,कल्याणी यादव,ईश्वरी गाडे,आराध्या शिंदे,प्रांजली यादव, आदिती यादव,मंजिरी यादव तसेच शिवम स्वामी,पृथ्वीराज चव्हाण, अर्जुन कांबळे,समर्थ गवळी,समीक्षा बुरजे,समर्थ गवळी,सृष्टी सावंजी ,राजनंदिनी जाधव,ज्ञानेश्वर स्वामी,कार्तिक कांबळे यांनी योग दिनानिमित्त उत्कृष्ट योगा नृत्य सादर करून लोकांची मने जिंकली.
योग दिनाचा प्रोटोकॉल यामध्ये योग प्राणायाम हात,पाय,मानेचे सूक्ष्म व्यायाम,ॲक्कू प्रेशर आयुर्वेदिक वनस्पतीचे महत्व इत्यादी विषयी माहिती योगशिक्षक नितीन मोरे,शिवकुमार स्वामी,प्रफुल्लता स्वामी आणि रवींद्र काशीद सर यांनी सांगितली.
या योग दिनानिमित्त इंग्लिश स्कूल,जवाहरलाल हायस्कूल मधील विद्यार्थी,योगसाधक अशा आठशे जणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार श्री.बालाजी शिंदे यांनी मानले.