मंगळवेढा:-
ॲबॅकस हे गणितीय कार्ये करण्यासाठी वापरले जाणारे रॉड्स किंवा ग्रूव्ह्सच्या बाजूने काउंटर सरकवून वापरले जाणारे एक गणना साधन आहे.
बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मूलभूत कार्यांची गणना करण्याव्यतिरिक्त,ॲबॅकस क्यूबिक डिग्रीपर्यंतच्या मुळांची गणना करू शकते.अशा गणना पद्धतीचे महत्त्व जाणून आमची उदयसिंह मोहिते पाटील शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते.
23-06-2024 रोजी सोलापूर केंद्रावर झालेल्या प्रोॲक्टिव्ह ऍबॅकस विभागीय स्तरावरील उन्हाळी स्पर्धेत आमच्या शाळेतील 18 विद्यार्थी आले.उदयसिंह मोहिते-पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले.
प्रोॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस,मुंबई तर्फे वर्षातून दोनदा वेगवेगळ्या प्रादेशिक स्तरावर या स्पर्धांचे आयोजन केले जाते. सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. UMP शाळेच्या 18 विद्यार्थ्यांपैकी इशानवी अजितसिंह पवार, श्रेया हनुमंत बिरादार यांनी प्रथम क्रमांक, सृष्टी हनुमंत बिरादार, प्रणिती दत्तात्रय शेवाळे यांनी तृतीय क्रमांक, स्वरा प्रवीण शिंदे यांनी 5 वा क्रमांक आणि साक्षी राजू जाधव, रणदेव जाधव यांनी 5 वा क्रमांक पटकावला.
स्नेहा कराळे, प्रांजली कराळे, श्रिया धायगोंडे, विराट शेंबडे, जयदीप जगताप, आशिष जाधव, प्रणव जाधव, सुदर्शन जाधव, अधिराज पवार, शिवतेज आतकरे, इंद्रभूषण शिंदे, श्रेयस माळी या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधीर पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका प्राजक्ता भगरे मॅम यांचे अभिनंदन केले. माननीय विश्वस्त डॉ.नंदकुमार शिंदे आणि डॉ.पुष्पांजली शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.