मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने ४८ व्या वर्षी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या चैतन्य संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक तबला वादनातून शिवरायांच्या चरणी शिववंदना अर्पण केली.
यावेळी चैतन्य संगीत विद्यालयाचे मार्गदर्शक संगीत विशारद प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल कुलकर्णी,सुदर्शन माने,विश्वजीत यादव,सुमित दुधाळ,ओम ढोबळे,मंगेश माळी,संस्कार इंगळे,ओंकार कुलकर्णी,स्वाती हजारे,अभिषेक पुजारी,पाडुरंग कोळी,अर्णव पाटील,समर्थ निंबाळकर,वेदांत आसबे,दत्तात्रय आसबे,समृद्धी आसबे,शिवतेज कलुबर्मे,श्लोक ढगे,आयुष ढगे,रामचंद्र पवार, उत्कर्ष क्षिरसागर,उदयनराजे भोसले आदी विद्यार्थ्यांनी कायदा,तोडे, चक्रधर,शिवगिते, भक्तीगीते सादर करून संगीत प्रेमींची मने जिंकली.
सुरवातीस प्रसाद पाटील यांचा मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष क्षिरसागर याने केले.