सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान.


मंगळवेढा:-

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ,मंगळवेढा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आज सोमवार दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वाजता पुष्प पाहिले महराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यात्या अनघा प्रदीप मोडक,विलेपार्ले मुंबई यांचे जगण्याचे गाणे होताना या विषयावर व्याख्यान होणार आहे.


जगण्याचे गाणे होताना या विषया वरती त्या व्याख्यान देणार आहेत.अंध असून देखील मनात इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थिती मध्ये आपण यश मिळवू शकतो व मनात दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण संकटा वरती मात करू शकतो याच्या वरती त्या मार्गदर्शन करणार आहेत.


तरी सर्व महिला भगिनींनी,शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केले आहे.


test banner