लोकप्रशंसक व्हॉइसचा बादशाह म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले निवेदक व्यक्तिमत्व - श्री.संतोष मिसाळ सर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

लोकप्रशंसक व्हॉइसचा बादशाह म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले निवेदक व्यक्तिमत्व - श्री.संतोष मिसाळ सरमंगळवेढा : 


निवेदनाच्या क्षेत्रामध्ये शब्दांची ओवी स्वप्नी दिसावी आणि सरस्वती मातेची शब्दसाधना मुखात विसावी असा कलाप्रपंच साधून उदरनिर्वाह करण्याचे पक्के व्यासपीठ पदरी घेणारे सोलापूर जिल्ह्यातील नामवंत व प्रसिद्धरिवर्तन निवेदक श्री. संतोष मिसाळ सर यांची साप्ताहिक वेध परिवाराने तालुकास्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.


संघर्षभरीत खडकाशी टक्कर द्यावी लागली तरी डोळे फुटता कामा नये. उलट त्या खडकाचीच छकले छकले उडाली पाहिजेत सकारात्मक समज आणि धैर्य मनाशी घालून सामाजिकदृष्ट्या सावरण्याचे आणि अर्थिकदृष्ट्या आवरण्याचे बळ ज्या कलेने बहाल केले ती आत्मकला म्हणजे "निवेदन... मुलगा कधी परमहंस बनेल तर कधी पुंडलिकाच्या सेवा समर्पक भावनेने आई- बापाला जगात मान, सन्मान, इज्जत मिळवून देईल अशी मानवतेची वीण घट्ट करण्यासाठी मिळालेले वरदान म्हणजे "निवेदन..."


वास्तविक पाहता चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही. पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आपलं आयुष्य साजरं करावं अशा कार्य सोपानाची कलाविभूती म्हणजे "निवेदन..."


 पोटाची खळगी आणि आत्मिक समाधानाचे ध्रुवखंड संतुलित करणाऱ्या शब्दसाधक श्री. संतोष मिसाळ सरांच्या निवेदन साधनेस साप्ताहिक वेध परिवाराचे संपादक मा. श्री. शिवाजी केंगार सर यांच्या माध्यमातून दशपूर्ती सोहळ्यानिमित्त उत्कृष्ट निवेदक या पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या व्यासंगकलेस आणखी समृद्ध करण्याचे मोठे प्रोत्साहनपर व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याबद्दल साप्ताहिक वेध परिवाराचे शतशः धन्यवाद....!!


शब्दांकन- श्री. अजय आदाटे (कृषीतज्ञ, ॲग्रीकॉस एक्सपोटर्स प्रा.लि.)


test banner