मंगळवेढा:महाविद्यालयात आज प्राचार्य प्रा.डॉ. एन.बी.पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली करिअर मार्गदर्शन विषयी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ते बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी सध्याच्या असणारे तंत्रज्ञान वापरून शिक्षणामधील संधी शोधण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्चितपणे मिळते तसेच कला व वाणिज्य शाखेमधील असणाऱ्या संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर सातारा मधील प्रा.डॉ.मोहन भोसले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील तसेच व्यवसाय क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी बाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.माने मॅडम व आभार प्रा.धनवे यांनी केले यावेळी वाणिज्य विभागातील प्रा.सावंत व भूगोल विभागातील प्रा. डॉ. पवार आर.एम. तसेच वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.