श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न.

 


                  मंगळवेढा:संत दामाजी महाविद्यालय व प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जानेवारी रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

                   सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ निरीक्षक राहुल खंदारे उपस्थित होते.सागर पाटील आरटीओ निरीक्षक यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व त्याचबरोबर या विषयाचे गांभीर्य उपस्थितांना त्यांना समजावून दिले यावेळी ते म्हणाले की साधारणतः १५ वर्षांमध्ये दोन कोटी मृत्यू होतात जी आकडेवारी जागतिक महायुद्धाएवढी असल्याची आपणास दिसून येते अपघाताचे प्रमाण हे १८ ते ४५ वयोगटांमध्ये जास्त असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर हेल्मेट सीट बेल्ट याबाबत ही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

                  प्रियांका माने सहायक निरीक्षक यांनी रोड इंजिनिअरिंग, एज्युकेशन,एनफोर्समेंट यांची माहिती दिली आपण मेंटली,फिजिकली फिट असेल तरच गाडी चालवावी त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर काय केले पाहिजे यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले पुष्कराज गाढवे वाहन निरीक्षक यांनी रस्त्यावरील वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे बोर्ड त्यांचा काय अर्थ होतो त्यापासून आपण कसा बोध घेतला पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले.

                 कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर एन बी पवार यांनी अपघात होऊ नये म्हणून काय केले पाहिजे आणि अपघात झाल्यानंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजाराम पवार यांनी परिश्रम घेतले डॉ.संजय क्षीरसागर यांनी आभार मानले.


test banner