स्व.यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त जय जवान महिला मंडळाकडून आदरांजली अर्पण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

स्व.यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त जय जवान महिला मंडळाकडून आदरांजली अर्पण.



                   मंगळवेढा:महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त जय जवान महिला मंडळाकडून व ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् चे संचालक अजय आदाटे  यांच्या उपस्थितीत स्व.यशवंतराव चव्‍हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                  यावेळी अजय आदाटे म्हणाले की, ‘‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्‍हाण यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याने महाराष्ट्राचे व देशाचे नाव आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले. केंद्रात त्यांनी उपपंतप्रधान, गृह, अर्थ व संरक्षण खाते सांभाळले. तरी महाराष्ट्रावरचे प्रेम त्यांनी कमी केले नाही व सर्वसामान्य गोरगरीबांचे नेते म्हणून ते लोकप्रिय होते. 

               त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व कृतीतून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आला अशी म्हण रूजू झाली. त्यांनी त्यांच्या कामातून सोलापूर साठी मोठ्ठे उजनी धरण पायाभरणी केला, विठ्ठलाची चंद्रभागा अडवली म्हणून पांडुरंगाला माफी मागनाऱ्या अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीस त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’’

              यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त लहान मुलांना ॲग्रीकॉस कडून शालेय साहित्य सुद्धा वाटप करण्यात आले.

              यावेळी जय जवान महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.



test banner