विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जवाहर प्रशालेचा संघ विजेता; १४ वर्षे मुले संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जवाहर प्रशालेचा संघ विजेता; १४ वर्षे मुले संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड.



                  मंगळवेढा:दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी सासवड पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत जवाहरलाल प्रशालेच्या १४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या संघाने अव्वल स्थान पटकावले.  तसेच १४ वर्षे मुली व १७ वर्षे मुले या संघानी उपविजेतेपद पटकावले. १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने नेत्र दिपक खेळ करत सासवडच्या संघावर यशस्वी मात करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

              १४ वर्षे वयोगटातील कप्तान सुमित दुधाळ याच्या नेतृत्वाखालील संघामध्ये सुमित माळी स्वप्नील पवार, समर्थ अवघडे, ओम मंडल, श्रेयस स्वामी, अथर्व ढगे, श्रीनाथ वाडेकर, सृजन म्हेत्रे, समर्थ हिरेमठ या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.


१४ वर्षे मुली उपविजेता संघ --

             कादंबरी माने, अनुष्का मोरे, पूर्वा बडोदकर, नंदिनी चव्हाण, सुफिया इनामदार, सलोनी वानखंडे, सृष्टी लोकरे, जवेरिया मकानदार, सिमरन मुजावर, श्रेया दत्तू, 

१७ वर्ष मुले उपविजेता संघ --

           विश्वजीत यादव, असीम शेख ,ओम ढोबळे ,आदित्य अवघडे, प्रेम चकोर, सोहम भगरे, तुषार बाबर ,अर्जुन अवघडे, शंभू खुळे, हुमायू कांबळे.

             स्पर्धेतील सर्व खेळाडूंना प्रशालेतील शिवकुमार स्वामी, नितीन मोरे, संतोष दुधाळ, शहाजी ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले. संघातील सर्व खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर आवताडे व मंगळवेढा एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


test banner