विठ्ठल कारखान्याची सर्वात मोठी घोषणा २८२५ रुपये प्रमाणे उसाला पहिली उचल,शेतकऱ्यांना केले हे आवाहन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

विठ्ठल कारखान्याची सर्वात मोठी घोषणा २८२५ रुपये प्रमाणे उसाला पहिली उचल,शेतकऱ्यांना केले हे आवाहन.

         


   

                            पंढरपूर:श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामातील एक लाख साखर पोत्यांचे  पूजन शनिवारी करण्यात आले.त्यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उसाला पहिली उचल प्रतिटन २८२५ जाहीर केली.

                            या पूर्वी चेअरमन पाटील यांनी गाळप हंगामा वेळी २५५० रुपयांची उचल जाहीर केली होती.त्यानंतर या शर्यती  मध्ये एक पाऊल पुढे टाकत आ.बबनदादा शिंदे यांनी २७०० रुपये तर प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या कर्मयोगी या कारखान्याच्या पहिली उचल ही २८०० रुपये जाहीर केली होती. तर आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी २८५० रुपये पहिली उचल जाहीर केली.

                   


                          पुढे बोलताना ते म्हणाले की उसाला प्रतिटन २८२५ रुपये उचल देणार असल्याचे संगितले व शेतकऱ्यांनी तो ऊस कुठेही वजन करून आणावा असेही आवाहन केले.

                         त्यांनी पुढे बोलताना सांगितले की डिसेंबर महिन्यातील उसाला २८५० रुपये तर जानेवारी महिन्यातील उसाला २९०० तर फेब्रुवारी महिन्यातील उसाला २९५० तर मार्च महिन्यातील उसाला ३००० रुपये उचल देणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

                          श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे या हंगामातील गाळप मोठ्ठ्या प्रमाणामध्ये सुरू केले आहे.गाळप सुरू झाल्यापासून १७ दिवसात १ लाख ३८ हजार ७४० टन उसाचे गाळप केले आहे.तर १ लाख क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे,अशी माहिती पाटील यांनी दिली.




test banner