देशाच्या इतिहासात सर्वात कर्तबगार पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी-प्रा. शिवाजीराव काळुंगे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

देशाच्या इतिहासात सर्वात कर्तबगार पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी-प्रा. शिवाजीराव काळुंगे.



                      मंगळवेढा:स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन मंगळवेढयातील कर्तुत्ववान महिलांचा व विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान मंगळवेढा शहर कॉंग्रेस कमिटी तसेच महिला कॉंग्रेस व युवक काँग्रेस व कॉंग्रेसच्या विविध सेलच्या वतीने रविवारी सकाळी 11:30 वाजता शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.

               


                         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती सावित्री मासाळ,माजी नगराध्यक्षा ललिता माळी,धनश्री  पतसंस्थेच्या चेअरमन शोभा काळुंगे,यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन निला आटकळे,जवाहरलाल प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका रेखा जडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रफुल्लता स्वामी,आसावरी महिला ग्रुपच्या अध्यक्षा दमयंती राजगुरू,जेष्ठ नागरिक संघाच्या महिला अध्यक्षा सुनंदा कलुबर्मे, माजी उपनगराध्यक्षा मीराबाई चेळेकर तसेच म.ता.कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मनोहर कलुबर्मे,प्रा.शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव पवार,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीधर भोसले,म. सा.प. दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे,गट शिक्षणाधिकारी आनंद लोकरे, सजग परिवाराचे प्रमुख संजय कट्टे,पाणी संघर्ष समितीचे अॅड. भारत पवार, मनसेचे नारायण गोवे, वंचित आघाडीचे बुवा गायकवाड,अॅड दत्तात्रेय खडतरे, दलित अत्याचार निर्मूलन  विरोधी समितीचे धोंडीराम साखरे,ख.वि.संघमाझी चेअरमन लक्ष्मण चेळेकर, सुरसंगम ग्रुप चे अध्यक्ष दिगंबर भगरे,अ.भा. म. नाट्यपरिषदेचे यतीराज वाकळे.आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

                 


                     प्रास्ताविक व सूत्रसंचालन  मंगळवेढा शहर काँग्रेसचे  सल्लागार राजेंद्र कुमार जाधव यांनी केले.अध्यक्षीय सुचना तालुका महिलाध्यक्षा जयश्री कवचाळे.तर अनुमोदन शहर महिलाध्यक्षा आयेशा शेख यांनी दिले.प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते नेहरू- इंदिराजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला मंगळवेढ्याचे मुंबईस्थित सुपुत्र उद्योजक संग्राम पाटील व शहर काँग्रेस कमिटीचे सल्लागार  दत्तात्रय वरपे यांचे अकाली निधन झाल्याने  श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर यांनी केले.

                    सदर प्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी आपल्या मनोगतात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसचा सिंहाचा वाटा असून नेहरू-गांधी घराण्याने समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. जगातील त्या वेळच्या प्रत्येक राष्ट्र प्रमुखांनी इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचे कौतुक केले.त्यावेळचे विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी सुध्दा इंदिराजीना दुर्गामातेचा अवतार असल्याचे सांगितले. तर भारताच्या इतिहासात सर्वात कर्तबगार  पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी होत्या.अशा अनेक नेहरू-गांधीच्या आठवणी काळुंगे यांनी आपल्या मनोगतात सांगितल्या.

                      या प्रसंगी तनुजा होनमाने,वैशाली गणेशकर,रेश्मा गुंगे,जयश्री कवचाळे,वैशाली कोष्टी,ॲड.सुजाता क्षीरसागर, सुरेखा इंगळे,भारती धनवे, अर्चना सलगर,ॲड हसिना सुतार,सुवर्णा राजमाने,अश्विनी चव्हाण,जयश्री रजपुत,स्मिता यादव,अंजली वस्त्रे,अंजली मोहिते,डॉ.राधिका काळुंगे,भारती चौगुले,डॉ. शुभांगी मासाळ,नंदाबाई कुंभार, क्रांती इंगोले,स्वाती माने,डॉजबॉल गोल्ड मेडल विजेता अमन शेख, शरीफ सय्यद,चंद्रकात पवार, प्रकाश मुळीक,सुभाष गाडे, प्रकाश स्वामी,पोपट महामुरे, माणिक मोरे,दिलीप कोष्टी, गेनू ढावरे,चंद्रकांत वेदपाठकवैभव माने,सुभाष गाडे व शिवाजी ढगे आदी. ४८ जणांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

                     यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,हनुमंत कोष्टी,प्रा.अकबर मुलाणी,भारत मासाळ,शहाजान पटेल,संभाजी सलगर,लहु ढगे,प्रा.राजेंद्र गायकवाड,नंदकुमार जाधव, राकेश गायकवाड,संजय चेळेकर, समाधान पाटील,तानाजी हजारे,पांडुरंग मासाळ,विठ्ठल चेळेकर,विक्रांत पंडित,वसंत रणदिवे,अजित शिंदे,आबा पवार, दत्ता सरगर,गोरक्ष जाधव, ज्ञानेश्वर सावंजी,दत्तात्रय तोडकरी वकील,भास्कर फुगारे, आबा भोसले, रेखा चेळेकर,सुनंदा आवताडे, संगीता काळुंगे-चेळेकर व उज्वला चेळेकर आदी. काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

                 सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुखदेव डोरले, इसाक शेख,सुरेश वाकडे,राजु शेख,अमोल लांडगे,शशिकांत माने,रोहित उगाडे,सुखदेव जोध, श्रीशैल माळी,विलास लंगोटे, सुनील दत्तू,नूरजहाँ पटेल,राणी माळी,हमीदा मुजावर,प्रतिभा माळी,भाग्यश्री कोले,अमिना पटेल,रूपाली काळे,महादेवी शिंदे,शाहीन खतीब यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार शहर युवकाध्यक्ष मनोज माळी यांनी मानले.



test banner