प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कारासाठी पंकज मस्के यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कारासाठी पंकज मस्के यांची निवड.                      मंगळवेढा:मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील कृषिविकास फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष पंकज मस्के  यांची कृषीथॉन नाशिक
येथे प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

                   नाशिक येथे ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या १६ व्या या आवृत्तीचे आयोजन दिनांक २३ ते२७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान करण्यात येत आहे. 
                   यात ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन यांच्या वतीने कृषीथॉन युवा शेतकरी सन्मान पुरस्कार २०२३ आयोजन करण्यात आले आहे. कृषिविकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज मस्के यांना  नाशिक येथे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञ, संस्था यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.test banner