मंगळवेढा नगरपरिषदेसमोरील I LOVE MANGALWEDHA हे नाव मराठीत करावे मनसेची मागणी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

मंगळवेढा नगरपरिषदेसमोरील I LOVE MANGALWEDHA हे नाव मराठीत करावे मनसेची मागणी.

 


         

              मंगळवेढा:मंगळवेढा नगरपरिषदेसमोर असलेले I LOVE MANGALWEDHA असं मोठ्या अक्षरात इंग्रजी लिहिलेलं लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ते तशाच पद्धतीचं मोठं नाव मराठीत आय लव मंगळवेढा असं करण्यात यावं.

               अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराच्या वतीने करण्यात आली.तसेच दुसरी मागणीही केली मंगळवेढा शहराकरिता नगरपरिषद मंगळवेढा यांनी बांधलेल्या एकाही व्यापारी संकुलनाला पार्किंगची सोय नाही. तसेच त्याकरिता स्वच्छतागृहाची नगर परिषदेने व्यवस्था केलेली नाही. असे असताना पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांकडून तसेच ग्राहक वर्गातून तो पार्किंगचे कोणतेही बोर्ड नसताना किंवा रस्त्यावरती पांढरी पट्टी नसताना दंडात्मक कारवाई केली जाते.



              एक तर नगरपरिषदेने मंगळवेढा शहरातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलना करिता पार्किंगची व्यवस्था व्हावी अन्यथा पोलीस प्रशासनाने तसेच नगरपालिकेत सुचवून दंडात्मक कारवाई थांबवावी.सध्या मंगळवेढे शहरांमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर येऊन ठेपलेला आहे.यामध्ये सर्वजण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे.परंतु ठोस भूमिका घेताना प्रशासन कुठेतरी कमी पडत पडत आहे. 

              सणासुदीच्या काळात छोट्या छोट्या गोर गरीब व्यापाऱ्यांकडून नगरपालिका प्रती चौरस मीटर प्रमाणे भाडे पावती करते व अचानक पणे त्यांना हाकलून दिले जाते जर हे अनाधिकृत असेल तर नगर परिषदेने आज पर्यंत गोळा झालेल्या पैशाचा हिशोब द्यावा व कारवाई थांबवावी जेणेकरून गोरगरीब व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान सणासुदीच्या काळात थांबेल तरी आमचे विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरील मागण्या तात्काळ मान्य करावेत ही विनंती अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी नगरपरिषदेचे साहेब साळुंखे साहेब यांना निवेदन देताना उपस्थित माननीय श्री राजवीर हजारे शहराध्यक्ष मंगळवेढा,शंकर गांडुळे तालुका अध्यक्ष,चंद्रकांत पवार जिल्हा उपाध्यक्ष, देवदत्त पवार तालुका उपाध्यक्ष, सुखदेव जोध तालुका संघटक ,मारुती वाघमारे तालुका संघटक रस्ते  अस्थापना  प्रवीण कोंडूभैरी, गोटू ओमने, अमोल मोरे विकास भोसले उपस्थित होते. 


test banner