मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात युवा चेतना रॅलीच्या ज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव (उन्मेश सृजन रंगाचा) दिनांक १० अॅाक्टोंबर ते १३ अॅाक्टोंबर २०२३ रोजी स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालय गोपाळपूर,ता पंढरपूर येथे होत असून सदर युवा महोत्सवाची चेतना युवकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी रॅली काढण्यात येत आहे.
यावेळी डॉ एन आर जगताप यांनी ज्योतिस पुष्पहार घालून रॅलीचे स्वागत केले तर प्रा विनायक कलुबर्मे यांनी युवा महोत्सवाचा चेतना रॅलीचा जागर घालून युवा महोत्सवासाठी दामाजी महाविद्यालयांकडून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी स्वेरी कॅालेजमधील प्राध्यापक,महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.