नवमहाराष्ट्र नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

नवमहाराष्ट्र नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड.


         


               मंगळवेढा:मंगळवेढा येथील सराफ गल्लीतील नवमहाराष्ट्र नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली. नव महाराष्ट्र नवरात्र महोत्सवात मंडळाच्यावतीने यावर्षी उत्तराखंडातील श्री केदारनाथ मंदिर प्रतिकृती देखावा उभारण्यात येणार आहे.तर दसऱ्याला २० फुटाची भव्य शिवमूर्ती, महाकाल नृत्य उज्जैन,नवदुर्गा नृत्य आंध्र प्रदेश,महाबली हनुमान आणि टीम देल्ही हे मिरवणुकी वेळी खास आकर्षण असणार आहे.

              याअगोदरही मंडळाने विविध सांस्कृतिक,सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम व उपक्रम राबविलेले आहेत. तसेच गतवर्षी विजयादशमीचे आकर्षक म्हणून केरळी नृत्य आणून अनेकांची मने जिंकलेली होती. यावर्षीही खास आकर्षणासाठी विविध राज्याच्या कलापथकातून संस्कृतीचे दर्शन घडविण्याचं येणार आहे. अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी देखावा व नवनवीन आकर्षणाच्या माध्यमातून नव महाराष्ट्र नवरात्र महोत्सव मंडळाची एक नवी आदर्शवत ओळख निर्माण केली आहे.

               याअगोदरही अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांचे अध्यक्ष व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे गैबीपीर उरूस कमिटीचे सरपंच पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडली आहे. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी राबलेल्या उपक्रमाबद्दल मंडळाला पोलिस प्रशासना कडून गौरविण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी मंगळवेढा येथे विविध क्षेत्रात आपली छाप पाडली असल्यामुळे सकाळच्या वतीने देखील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.


test banner