मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने डेंग्यू-मलेरिया विरोधी मोहीम राबवावी वारी परिवाराच्या वतीने निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने डेंग्यू-मलेरिया विरोधी मोहीम राबवावी वारी परिवाराच्या वतीने निवेदन.

                    मंगळवेढा:दोन वर्षे झाली नगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे त्यामुळे प्रशासक नेमले आहे.तरी पन कायमस्वरूपी मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची नेमणूक नसल्यामुळे मंगळवेढा शहरात स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे.त्यामुळे डेंगू-मलेरिया सारखी साथ शहरभर पसरलेली आहे लहान मुले खूप मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत याची कोणालाच काळजी नाही तरी शहरवासीयांनी याच्यावर आवाज उठवणे गरजेचे आहे त्यासाठी वारी परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले.


                 नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरात जाऊन घराच्या इमारतीच्या इत्यादी परिसरामध्ये तसेच घराच्या छतावर इमारतीच्या गच्चीवर इत्यादी ठिकाणी नारळाच्या करवंट्या,टायर्स,रिकामे डबे,बाटल्या,तुटलेल्या कुंड्या,रंगाचे रिकामे डबे,संडासची तुटलेली भांडी,भंगार वस्तू इत्यादी पाणी साचण्याची शक्यता असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावावी नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा. 

                 अशाप्रकारे नागरिकांचे प्रबोधन करावे जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंगू-मलेरिया सदृश्य रुग्ण आढळून येत असल्यामुळे मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने फवारणी व स्वच्छता मोहीम अधिक तीव्र राबविण्यात यावी तसेच वारी परिवाराच्या वतीने डेंगू-मलेरिया प्रतिबंध जनजागृती माहितीपर पत्रके शहरात वाटण्यात येणार आहेत स्वच्छता निरीक्षक सुनील सर्वगोड यांना निवेदन देताना संजय कट्टे, सोबत अजित जगताप,विलास अवताडे,रामचंद्र दत्तू,सत्यजित सुरवसे अरुण गुंगे,नाना भगरे गणेश दत्तू,चंदू कडगंची,परमेश्वर पाटील,रविकिरण जाधव,स्वप्निल फुगारे,विष्णुपंत भोसले,स्वप्निल टेकाळे,विनायक कलुबरमे,सतीश दत्तू उपस्थित होते.


test banner