राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते, पंढरपूर-मंगळवेढा राष्ट्रवादीचे नेते,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये माणिक गुंगे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
निवडीचे पत्र दिल्यानंतर गुंगे बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा व गाव तेथे कार्यालय करून आपण मेहनत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी गुंगे हे मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष आसताना त्यांनी आपल्या कार्यातून संघटना मजबूत व वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.त्यामध्ये कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी व ज्येष्ठांसाठी बससेवा सुरू करावी त्यासाठी निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला,चारा डेपो व चारा छावण्या सुरू करण्यासाठी ही निवेदन देऊन पाठपुरावा केला.
अश्या विविध कार्यातून आपली छाप उमटवून या पदावरती आपलं नाव कोरल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.