आरक्षणाचा लढा तीव्र,मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षणासाठी राजीनामे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

आरक्षणाचा लढा तीव्र,मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षणासाठी राजीनामे.



                मंगळवेढा:सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी ता अंबड जि जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकात सुरू असलेला साखळी उपोषणाचा लढा अधिक तीव्र झाला.

              आज सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत यामध्ये मनसे जिल्हा समन्वयक नारायण गोवे, शहराध्यक्ष दत्तात्रेय हजारे, काँग्रेसचे मारुती वाकडे,शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रहार संघटना तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल घुले,मनसे तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार,वाहतूक सेना शहराध्यक्ष कृष्णा ओमने,शंकर गांडुळे,युवराज चौगुले,राजेंद्र सावंत,सिद्धेश्वर पाटील तसेच विविध ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणाला पाठिंब्याचे पत्र व सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली.


.

test banner