मंगळवेढा:ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स प्रा.लि पुणे व वारी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रीनिमित्त "कल्पकतेला वाव देऊया नवरात्रीचे रंग भरुया" या अंतर्गत लहान व मोठ्या गटातील रंगभरण स्पर्धा संपन्न झाली.
मंगळवेढ्यात देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला तसाच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना देखील रंगभरण स्पर्धेतून वाव देण्यात आला सदर स्पर्धेत इंदिरा गांधी, सावित्रीमाई फुले, अहिल्यामाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ कर्तृत्ववान महिलांची चित्रे रंगविण्यासाठी देण्यात आली सदर स्पर्धेत प्रत्येक गटात, प्रत्येक शाळेत एक क्रमांक काढण्यात येणार असून विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व सन्मान प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यावेळी स्पर्धेमध्ये सर्व नगरपालिकेच्या शाळा महाराणी ताराबाई स्कूल, जवाहरलाल हायस्कूल, उदयसिंह मोहिते पाटील स्कूल, मंगळवेढा यांचेसह १२ शाळांनी सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स व वारी परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.