मंगळवेढयात शासनाला जाग आणण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

मंगळवेढयात शासनाला जाग आणण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा.

   


             

                     मंगळवेढा:सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे,कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन का घेत नाही ? शासनाने गठीत केलेल्या शिंदे समितीला १० हजार पुरावे सापडले असले तरी समिती का निर्णय देत नाही ?

                    ज्या जाती राज्यात आरक्षणात घातल्या त्यांना नेमके कुठले निकष लावून घातले ते सरकारने सांगावे ? आदी प्रश्नांकडे लक्ष वेधावे याकरीता झोपेचं सोंग घेतलेल्या शासनाला जाग यावी यासाठी मंगळवेढयात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मशाल पेटवून भव्य क्रांती मोर्चा काढण्यात आला सुरवातीस आरक्षणाच्या लढ्यासाठी ज्या मराठा बांधवांनी आपले बलिदान दिलेले आहे.

         


                      त्या सर्व मराठा बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण लढ्याच्या जनजागृतीसाठी सदर मोर्चात बहुसंख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते यावेळी संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,एकच मिशन मराठा आरक्षण,कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय,आरक्षण देत नसलेल्या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय,एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर अक्षरशा दणाणून सोडला साखळी उपोषणाच्या ठिकाणाहून निघालेल्या मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने दामाजी चौकात करण्यात आला यावेळी महिला भगिनी व मराठा बांधव सहभागी होते.

test banner