स्व.सुभाष शहा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत दामाजी महाविद्यालयात स्वच्छता अभियान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

स्व.सुभाष शहा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत दामाजी महाविद्यालयात स्वच्छता अभियान.
                     श्री संत दामाजी महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रतनचंद शहा सहकारी बँकेचे माजी चेअरमन स्व सुभाष रतनचंद शहा यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


                 यावेळी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राबहेरील काटेरी झुडपे, प्लास्टिक पिशव्या,बाटल्या गोळा करून योग्य ती विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्यात आला विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर श्रमाचे महत्त्व कळावे,त्यांच्यावरती श्रमाचे संस्कार व्हावेत यासाठी घेतलेल्या स्वच्छता अभियानात इयत्ता ११ वी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.


                    सदर अभियान यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर,प्रा विलास गुरव,प्रा धनंजय मेहेर,प्रा महेश डोके,विनायक कलुबर्मे यांनी परिश्रम घेतले.


test banner