मंगळवेढा:-
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुढवी गावात 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत हनुमान मंदिरासमोरील जागेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंगळवेढा ते मुढवी टू व्हीलर रॅली काढून सोलापूर येथील शांतता रॅलीची जनजागृती करण्यात आली व सकल मराठा समाजाच्या वतीने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी 103 शिवभक्तांनी रक्तदान केले मुढवी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता.
सकल मराठा समाज मुढवी यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.