जालन्यातील घटनेचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटले;आज मंगळवेढा मध्ये ही निषेध नोंदविणार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

जालन्यातील घटनेचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटले;आज मंगळवेढा मध्ये ही निषेध नोंदविणार.

           


जालना येथील अंतरवली येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणच्या आंदोलकांवर लाठचार्ज करण्यात आला.लाठी मार झाल्यानंतर आंदोलन चिघळल्याची माहिती समोर आली आहे.

       या घटनेत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत.


        तसेच पोलीस हे देखील जखमी झाले आहेत.समाजबांधव यांच्या वरती झालेला लाठीचार्ज चे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भर उमटले आहेत.

      लाठीचार्ज नंतर जाळपोळची ही घटना घडली आहे.


         जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर अंतवरली मध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याची माहिती आहे.

                 या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवेढा मध्ये सकाळी 10.30 वाजता दामाजी चौकामध्ये निषेध नोंदविला जाणार आहे.तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज्याच्या वतीने करण्यात आले आहे.


              या घटनेचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत असताना आज मराठा क्रांती मोर्चा कडून पंढरपूर,बीड,नंदुरबार,नाशिक मध्ये ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

            झालेल्या त्या घटनेच्या निषेधार्थ १०.३० वाजता निषेध नोंदविण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी  दामाजी चौका मध्ये उपस्थित राहावे.


test banner