श्री संत दामाजी महाविद्यालयात वृक्षांना राख्या बांधून केले रक्षाबंधन साजरे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात वृक्षांना राख्या बांधून केले रक्षाबंधन साजरे.


             


 श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या वृक्षांना मुलींनी राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

               


      प्रत्येक भाऊ जसा आपल्या बहिणीचा पाठीराखा रक्षणाकर्ता असतो अगदी त्याप्रमाणेच झाडे हेच आपल्या मानवजातीचे खरे रक्षणकर्ते आहेत  झाडे आपल्याला जगण्यासाठी अॅाक्सीजन देतात म्हणूनच आपण जीवंत आहोत.

                        विद्यार्थ्यांचे निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे व पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येणे काळाची गरज बनली आहे. हा विचार विद्यार्थ्यांच्या मनी रूजावा या हेतूने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व शिक्षक उपस्थित होते सदर आगळावेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा  शैलेंद्र मंगळवेढेकर,प्रा धनाजी गवळी,प्रा विनायक कलुबर्मे यांनी परिश्रम घेतले.